WhatsApp Join Group!

Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर: अजित पवारांविरुद्ध पुतण्याची थेट लढत!

Sharad Pawar Candidate List: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या खूप तापलेलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडून 2024 विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावे समाविष्ट असून, या यादीने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे.

यादीनुसार, बारामतीसाठी युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार अशी थेट लढत रंगणार आहे. पवार कुटुंबामधील हे संघर्षाचे पर्व नेहमीच चर्चेत राहिले आहे, परंतु आता विधानसभेत देखील काका-पुतण्यात राजकीय लढाई बघायला मिळणार आहे.

शरद पवार गटाच्या यादीतील 45 नावे अशी आहेत: Sharad Pawar Candidate List

मतदारसंघउमेदवार
इस्लामपूरजयंत पाटील
काटोलअनिल देशमुख
घनसावंगीराजेश टोपे
कराड उत्तरबाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवाजितेंद्र आव्हाड
कोरेगावशशिकांत शिंदे
बसमतजयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर
इंदापूरहर्षवर्धन पाटील
राहुरीप्राजक्त तनपुरे
शिरुरअशोक पवार
शिराळामासिंगराव नाईक
विक्रमगडसुनील भुसारा
कर्जत-जामखेडरोहित पवार
अहमदपूरविनायकराव पाटील
सिंदखेडराजाराजेंद्र शिंगणे
उदगीरसुधाकर भालेराव
भोकरदनचंद्रकांत दानवे
तुमसरचरण वाघमारे
किनवटप्रदीप नाईक
जिंतूरविजय भामरे
केजपृथ्वीराज साठे
बेलापूरसंदीप नाईक
वडगाव शेरीबापूसाहेब पठारे
जामनेरदिलीप खोडपे
मुक्ताईनगररोहिणी खडसे
मूर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्वदिनेश्वर पेठे
किरोडारविकांत गोपचे
अहिरीभाग्यश्री आत्राम
बदनापूरबबलू चौधरी
मुरबाडसुभाष पवार
घाटकोपर पूर्वराखी जाधव
आंबेगावदेवदत्त निकम
बारामतीयुगेंद्र पवार
कोपरगावसंदीप वरपे
शेवगावप्रताप ढाकणे
पारनेरराणी लंके
आष्टीमेहबूब शेख
करमाळानारायण पाटील
सोलापूर शहर उत्तरमहेश कोठे
चिपळूणप्रशांत यादव
कागलसमरजीत घाटगे
तासगाव – कवठेमहंकाळरोहीत पाटील
हडपसरप्रशांत जगताप

या यादीत आणखी काही महत्त्वाच्या नावांचा समावेश असून, ज्यामध्ये भाजपातून आलेले नेतेही आहेत. हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे आणि सुधाकर भालेकर यांना यादीत स्थान देण्यात आलं आहे. ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे, या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी बारामतीत कसा ‘गेम’ खेळला आहे, हे वेळच सांगेल. पवार कुटुंबाच्या अंतर्गत संघर्षाची ही लढाई महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीत महिला उमेदवारांचा देखील महत्त्वपूर्ण समावेश आहे. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पारनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिलांची भूमिकाही मोठी राहणार आहे.

या यादीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादळ निर्माण केला आहे. शरद पवार गटाच्या या यादीने सत्तेच्या राजकारणात नवी दिशा निर्माण केली आहे, आणि या यादीतून विरोधी पक्षांसाठी मोठे आव्हान उभं राहिलं आहे.

Samsung Galaxy S23 FE वर 61% डिस्काउंट! दिवाळी सेलमध्ये धमाका ऑफर, किंमतीतील जबरदस्त घसरण

News Sorce- tv9marathi.com

Leave a Comment